मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी (काँग्रेस), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगांवकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली.
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे दिवस संपले’; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- मन जिंकलस पांड्या! दिलदारी दाखवत पांड्याने ‘मॅन ऑफ दि सिरीज’ पुरस्कार नटराजनला दिला
- ‘शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षित लोकं रस्त्यावर आले असते तर ना विमानतळं विकली गेली असती, ना…’
- ज्या देशातील शेतकरी दुःखी, तो देश कधीच प्रगती करत नाही – उर्मिला मातोंडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

