औरंगाबाद : यंदा फुलंब्री तालुक्यात केवळ १७ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढला आहे तर ४५ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दोन वेळा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी उदासीनता दाखविली आहे. तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ५६ हजार हेक्टर असून पिके घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ६१ हजार आहे. येणाऱ्या काळात पिकाला काही कारणास्तव धोका झाल्यास त्यांना विमा मिळणार नाही, त्यांना केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून रहावे लागेल.
सध्या पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. जुन महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली होती. तालुक्यातील पेरणीलायक क्षेत्रापैकी १०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. मात्र महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिकांना धोका निर्माण झाला होता. आता तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
खरीप पिकाचे भविष्य पूर्ण पणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गरजेपेक्षा जास्त पाऊस पडला, तरी पिकाचे नुकसान होते, तर गरजेपेक्षा कमी पावसामुळेही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. याशिवाय, अचानक पडलेल्या रोगराईचाही पिकांना धोका असतोच. त्यामुळे, शेतकऱ्यांनी जागृत राहून आपले पिकाला संरक्षण देण्यासाठी विचार केला पाहिजे. गेल्या वर्षी पिकविम्याचा अपेक्षित परतावा मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी यंदा पीकविमा भरण्यासाठी उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझाच बळी जातोय’, प्रताप सरनाईकांची खंत
- ‘औरंगाबादच्या दीक्षा शिंदेंची नासात निवड ही अफवा!’, खा.जलील यांचे ट्विट
- ‘भारताने अद्यापही तालिबानवर बंदी का घातली नाही?’, ओवेसींचा मोदींना सवाल
- महाविकास आघाडीचा निर्णय! आशा स्वयंसेविकांना हजार रुपये, गटप्रवर्तकांना १२०० रुपये वाढ
- महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करतायत – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
