🕒 1 min read
मुंबई : राज्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहात अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मुद्दा उपस्थित केला.
“मुख्यमंत्री महोदय मधल्या काळामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबानां भेटलो होतो. त्यांनी मला सागितलं होत कि तुम्ही ४० आमदार कुठे जाणार नाही. तुमची काम करणार आहे. जरा गप्प बसा एक दिवस तरी विरोधी पक्षाचं ऐकू दे. तुमच्या करता एक वेगळं ऑफिस उघडलं आहे. काळजी करू नका. तुम्हाला ४० लोकांना लई सांभाळायचं आहे. ते वरचे १० तसेच आहे. महाराष्ट्राची जनता खूप अशाने पाहत आहे. मगाशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं पांढरी दाढी-काळी दाढी पांढऱ्याची काळी दाढी करतात असं मी ऐकलं आहे. परंतु तुम्हाला कळ्याची पांढरी करायची असेल तरी करा. पण जाऊद्या मी त्याच्या खोलात जात नाही. परंतु राज्याच्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहजे. शेतकरी खूप अशाने पाहत आहे. जर मदत केली नाही तर तो पुन्हा आत्महत्या करण्याकडे वळेल. जे माणुसकीला शोभणारं नाही.” असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- मोठी बातमी । दहीहंडीला मिळाला खेळाचा दर्जा! सरकारी नोकरीत आरक्षण; मुख्यमंत्र्याची घोषणा
- Breaking News | मुंबईनंतर आता पुण्यातही नाकाबंदीला सुरुवात; संशयास्पद बोटीमुळे राज्यभरात रेड अलर्ट
- Ajit Pawar | कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल सांगता येत नाही; अजित पवारांचा शिंदे गटाला टोला
- Devendra Fadnavis | अफवांवर विश्वास ठेवू नका; देवेंद्र फडणवीसांनी दिले संशयास्पद बोटीचे तपशील
- Breaking News | संशयास्पद बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स; चौकशीसाठी स्पेशल पथक नेमण्याची तटकरेंची मागणी

