Share

Breaking News | मुंबईनंतर आता पुण्यातही नाकाबंदीला सुरुवात; संशयास्पद बोटीमुळे राज्यभरात रेड अलर्ट

Published On: 

रायगड : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावरील समुद्रात एक संशयास्पद बोट सापडली आहे. या बोटीत तीन AK-47 आणि बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगामी काळात अनेक मोठे सण आणि उत्सवही आहेत. त्यामुळे याच्याच पार्श्वभूमीवर राज्यभरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सतर्कतेच्या सूचना देत पुण्यात हाय अलर्ट जरी केला आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे.

दुसरीकडे मुंबईमध्येही पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पोलिसांकडून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. तसेच मुंबईतील सर्व चौपाट्यांवरही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या असून जवळपास सर्वच ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यातील महत्वाच्या आणि वर्दळीच्या भागांतील चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षकांनी सतर्कतेचे आदेश दिले असून रत्नागिरी जिल्ह्यात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.

https://youtu.be/lgz7BR8IrHc

२४ तास पोलिसांची नजर

रायगडमध्ये सापडलेल्या संशयास्पद बोटीमुळे सागरी महामार्गावरील गस्त वाढवण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यांवर आणि तेथील लँडिंग पॉईंटवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. या परिसरातील गाडयांची तपासणीही करण्यात येत आहे. तर आगामी काळात येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पोलिसांना आणि इतर तपास यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच या बोटीचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!