मुंबई : दहीहंडी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणार सण आहे. अनेक गोविंदा पथके वर्षभर दहीहंडीसाठी थर लावण्याचा सराव करत असतात. दहीहंडी या एका दिवसाच्या सणासाठी गोविंदाचा उत्साह न्याराच असतो. मात्र या उत्साहात विरजण घातलं जातं ते गोविंदांच्या मृत्यूमुळे. दर वर्षी थर लावल्यावर तोल जाऊन अनेक गोविंदा जखमी होतात किंवा त्यांचा मृत्य होतो. तरीही गोविंदा पथके दरवर्षी तितक्याच जोमात दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणूनच आता या दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे.
गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात असल्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली होती. त्यातच आज दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणाही केली आहे. तसेच दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असून या गोविंदांना सरकारी नोकरीत प्राधन्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर दहीहंडी फोडताना पथकातील एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याला १० लाख रु. तर गोविंदा गंभीर जखमी झाल्यास ७.५० लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच एखादा अवयव निकामी झाल्यास 5 लाख रु अर्थ सहाय्य केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
आता भरणार ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा
प्रो कबड्डी या प्रसिद्ध स्पर्धेप्रमाणे आता प्रो दहीहंडी ही स्पर्धा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे दहीहंडी आता केवळ एक दिवस नाही तर वर्षभर खेळ रूपात खेळली जाणार आहे. या खेळात सहभागी खेळाडूंना इतर खेळाडूंप्रमाणे सुविधा दिल्या जातील. या स्पर्शेभूमीवर राज्याच्या क्रिडा विभागाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar | कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल सांगता येत नाही; अजित पवारांचा शिंदे गटाला टोला
- Devendra Fadnavis | अफवांवर विश्वास ठेवू नका; देवेंद्र फडणवीसांनी दिले संशयास्पद बोटीचे तपशील
- Breaking News | संशयास्पद बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स; चौकशीसाठी स्पेशल पथक नेमण्याची तटकरेंची मागणी
- Breaking News | हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट; बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स
- Nitish Kumar | “आमचे नाते खूप जुने…”: लालू यादव यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं वक्तव्य


