Share

छत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या अश्वारुढ स्मारकासमोर ३१ फुटी स्वराज्यगुढी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात शिवाजीनगर एसएसपीएमएस येथील जगातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ स्मारक व शिवराज्याभिषेक शिल्पासमोर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड ३१ फुटी स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समानतेने भरली, तो शिवराज्याभिषेक तथा शिवस्वराज्य दिन पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित होते.शिवराज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे संकल्पक व शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाविकास आघाडीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी परवानगी दिली. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी यावर्षी 6 जून शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साजरा करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली आणि त्यासाठी शासनाचा जीआर काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने सर्व महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला पाहिजे. पुढील वर्षी 6 जून शिवराज्याभिषेक दिवस आपण कोरोना मुक्त झालेला साजरा करू असे मत या वेळी आणि उदय सामंत यांनी व्यक्त केले.

पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारुन पूजन करण्यात आले.

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. यावर्षी देखील विविध ठिकाणी स्वराज्यध्वज व स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे संकल्पक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कंक, समीर जाधवराव, अनिल पवार, किरण साळी, किरण देसाई, सचिन पायगुडे, निलेश जेधे, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, दीपक घुले, महेश मालुसरे, सागर पवार, मंदार मते, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले.

पहा व्हिडीओ –

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/556033645769931/

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!