Share

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान

Published On: 

सांगली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक मराठा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी अद्याप वेळ दिली नसल्याने संभाजीराजे यांनी उघड नाराजी व्यक्त होती. दरम्यान, मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने राज्य सरकारवरील दबाव अधिक वाढत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील मराठा आरक्षणासाठी मोदींची भेट घेणार असल्याचं विधान केलं आहे.

‘मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून, वेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता संसदेत याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करणार आहे,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी संगीतीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!