Share

Bhagwant Mann Marriage : साध्या पद्धतीनं संपन्न झाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा लग्नसोहळा

Published On: 

पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. चंदीगढ येथील गुरूद्वारामध्ये आयोजित खासगी समारंभामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. भगवंत मान यांचा हा दुसरा विविह आहे. त्यांच्या आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत जी भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात. भगवंत मान ज्यांच्याशी लग्न झालं तिचे नाव डॉ. गुरप्रीत कौर आहे.

भगवंत मान आणि त्यांची पत्नी गुरप्रीत कौर एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. भगवंत मान यांच्या आईलाही मुलगी पसंत पडली होती. भगवंत मान यांच्या आईची इच्छा होती, त्याने दुसर लग्न कराव. भगवंत मान यांचा विवाह मुख्यमंत्र्यांच्या आई आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच डॉ. गुरप्रीत कौरशी झाला. तसेच हा विविह सोहळा अत्यंत सध्या पद्धतीत पार पडला.

खाजगी पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात भगवंत मान यांच्याकडील २० आणि गुरप्रित यांच्याकडील २० लोक सहभागी झाले होते. या लग्नाला विशेष अतिथी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान हे राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 आणि 2019 मध्ये ते सलग दोन वेळा खासदार झाले. यानंतर वयाच्या अवघ्या 48 वर्षीय भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!