ठाणे : मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच एकनाथ शिंदे यांनी कामाचा धडाका लावला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची टाकत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले. यानंतर ठाण्यातील ऑटो-रिक्षा चालकांनी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले.
तसेच ठाण्यातील रिक्षाचालकांनीं एकनाथ शिंदे यांना समर्थन “मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री” चा नारा दिला आहे. ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षा वाले जमून रैली काढणार आहेत. या रैली ला खासदार श्रीकांत शिंदे , माजी महापौर नरेश म्हस्के देखील उपस्थित असणार आहे. रिक्षा चालकांनी टीशर्ट घातले आहे त्यावर मजकुर. “मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री” असा उल्लेख करण्यात आला आहे. टीशर्ट वर रिक्षाचे चिन्ह व रिक्षावर लालबत्ती दाखवण्यात आलेली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या समोर लावण्यात आलेल्या बॅनरवर “होय, आम्हाला अभिमान आहे, आमचा रिक्षावाला (ऑटो चालक) मुख्यमंत्री झाला,” असे मराठीतील बॅनरवर लिहिले आहे. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या (TMC)समोर सुमारे100 ऑटोचालक देखील मेळाव्यात सहभागी झाले तसेच य़ा ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. यासोबतच चालकांनीही आपल्या वाहनांवर देखील ही घोषणा असलेले स्टिकर्स देखील चिकटवले.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

