औरंंगाबाद : विट्टभट्टीच्या कामासाठी उचल म्हणुन घेतलेली रक्कम परत दे किंवा कामावर परत ये असे सांगितल्याच्या कारणावरून सहा ते सात जणांनी पोलिस कर्मचा-यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज परिसरातील साजापूर चौकात घडली.
सुरेश इसाराम बोराडे (वय ४३, रा. रांजणगाव) आणि गणेश सखाराम वाघ (वय २३, रा. जयभवानी चौक, बजाजनगर), सलीम व अन्य पाच जणांनी जलील खान हबीब खान पठाण (वय ५०, रा. एमआयडीसी वाळुज) या पोलिस कर्मचा-यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
जलील खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ करून धक्काबुक्की करणा-या विटभट्टीवरील कामगारांविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

