Share

पेट्रोलचा टँकर बॅरिकेटला धडकला

Published On: 

औरंंगाबाद : पडेगाव परिसरात नाकाबंदीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटसला भरधाव वेगाने जाणाऱ्या पेट्रोलच्या टँकरने धडक दिली. ही घटना २१ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार अंकुश नामदेव माळी हे आपल्या सहकार्यांसह पडेगाव येथील बॉम्बे नाका येथे रस्त्यावर बॅरिकेटस लावून नाकाबंदी मोहिम राबवत होते. त्यावेळी पेट्रोलचा टँकर क्रमांक (एमएच-४१-एजी-४६८०) हा रस्त्यावर लावलेला बॅरिकेटसला जावून धडकला.

या अपघातात वाहतूक शाखेच्या बॅरिकेटसचे नुकसान झाले. वाहतूक शाखेचे अंमलदार अंकुश माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालक बापुर हरिचंद्र पडवाल (रा.नांदगाव, जि.नाशिक) याच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!