Share

पुणे शहरात आज नव्याने २४४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Published On: 

पुणे : पुणे शहरात आज नव्याने २४४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९४ हजार ९६८ इतकी झाली आहे. शहरातील २६१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८३ हजार ७६७ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ३१२ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३१ लाख ११ हजार ०६८ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार २८९ रुग्णांपैकी २०८ रुग्ण गंभीर तर २९१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ९१२ इतकी झाली आहे.

दरम्यान कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात न्यावं लागण्याचा धोका हा दुपटीनं अधिक असल्याचं ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या मते ‘द लँसेंट’ या प्रसिद्ध पत्रकामध्ये प्रकाशित झालेल्या या महत्त्वाच्या अभ्यासावरून लोकांचं पूर्ण लसीकरण होणं का गरजेचं आहे? हे लक्षात येतं. त्यांच्या मते कोरोना व्हायरसच्या कोणत्याही व्हेरिएंटमुळं निर्माण होणारा धोका हा लसीकरणानं कमी होतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!