🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Council elections) 10 जागांसाठी आज (सोमवार) मतदान होत आहे. ही निवडणूक 10 दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच रंजक ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत इतर पक्ष शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले असले तरी मुख्य लढत काँग्रेसच्या दुसऱ्या आणि भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी प्रत्येकी दोन आणि भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान २६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व पक्ष फिल्डींग लावत आहेत. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) आजारी असतानाही मतदान करण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिकेतून विधानभवन गाठले. मुक्ता टिळक (Mukta Tilak) आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला.
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक राज्यसभा निवडणुकीसाठी देखील रुग्णवाहिकेतून मतदानासाठी आले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला मोठा झटका बसला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करिष्म्यामुळे भाजपने विक्रमी जादा जागा जिंकल्या. या विजयाचा फेटी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन आमदारांवर बांधला होता. विजयाचे श्रेय त्यांनी पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांना दिले. त्यामुळे हेच चित्र आता विधान परिषदेत दिसेल का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्वीट करत विरोधकांना उत्तर दिल आहे. “ही लढाई प्रतिष्ठेची नसून पक्षनिष्ठा आणि लोकशाहीप्रती असलेले माझे कर्तव्य पार पाडण्याची आहे. त्यामुळे पक्षातील कोणीही आग्रह केला नसून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी विधानभवनात मतदानाला आलो आहे.” आजारी असताना जीवाची पर्वा न करता आमदारांना मतदानासाठी आणल्यामुळे सत्ताधारी भाजपवर टीका करत आहेत. याला लक्ष्मण जगताप यांनी खोचक उत्तर दिल आहे.
हि लढाई प्रतिष्ठेची नसून पक्षनिष्ठा आणि लोकशाहीप्रती असलेले माझे कर्तव्य पार पाडण्याची आहे. त्यामुळे पक्षातील कोणीही आग्रह केला नसून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी विधानभवनात मतदानाला आलो आहे.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @girishdmahajan @maheshklandge @BJP4Maharashtra
— Laxman Jagtap (@iLaxmanJagtap) June 20, 2022
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होण्यास सक्षम आहेत, परंतु काँग्रेसचे दुसरे उमेदवार म्हणजे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक (भाऊ) जगताप यांना 12 अतिरिक्त मतांची गरज आहे आणि भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना 22 अतिरिक्त मतांची गरज आहे. . परिस्थिती पाहता काँग्रेसचे पारडे जड असल्याचे दिसत असले तरी राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने केवळ काँग्रेसच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही चिंतेत टाकले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
