Share

पुणे शहरात आज नव्याने २२१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Published On: 

पुणे : पुणे शहरात आज नव्याने २२१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९१ हजार ६६५ इतकी झाली आहे. शहरातील २५४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८० हजार ६७८ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ८ हजार ७३३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ५४ हजार ६२४ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार १०८ रुग्णांपैकी २०९ रुग्ण गंभीर तर २५० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८७९ इतकी झाली आहे.

दरम्यान आज मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. यावेळी ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!