🕒 1 min read
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी सोमवारी (दि.३१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद जनऔषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र शहागंज येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या २०० खाटांचे सुसज्ज महिला रुग्णालयाची गठीत रुग्णालय समितीसह स्थळ पाहणी करुन तात्काळ सविस्तर अहवाल व अंदाजपत्रक शासनस्तरावर प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच रुग्णालय उभारण्याकरिता जेवढा निधी लागेल तो मंजूर करुन आणणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख(Amit Vilasrao Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र शहागंज येथे गोरगरीब महिला रुग्णांना विविध आजारावर वेळेवर उपचार मिळावे व गरोदर महिलांची प्रसूती सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक होण्यास मदत व्हावी याकरिता अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. तसेच त्यासंबंधी लेखीपत्र सुध्दा वैद्यकीय मंत्री यांना देऊन घाटीचे अधिष्ठाता वर्षा रोटे कागीनाळकर यांना प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे कळविले होते.
इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महिला रुग्णालय उभारण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अधिष्ठाता वर्षा रोटे कागीनाळकर यांनी २०० खाटांचे सुसज्ज महिला रुग्णालय सुरु करणेसंबंधी पाच सदस्यीय समिती गठीत केली. डॉ.मोहन डोईबळे प्राध्यापक व विभागप्रमुख जनऔषध वैद्यकशास्त्र यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीत डॉ.श्रीनिवास गडप्पा (प्राध्यापक व विभागप्रमुख स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र), डॉ. सुधीर चौधरी (विशेष कार्य अधिकारी अतिविशेषोपचार रुग्णालय), इनचार्ज लिपिक (बांधकाम विभाग रुग्णालय) आणि एम.के. सैय्यद (विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद) यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Budget 2022 : मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला जाईल- निर्मला सीतारामन
- Budget 2022 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे-अतुल भातखळकर
- हॉकी प्रो लीग: भारतीय महिला संघाकडून चीनचा ७-१ने पराभव
- “अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
- “मुख्यमंत्री दारात वाईन… मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?”, चित्रा वाघ यांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
