🕒 1 min read
गडचिरोली : राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २० – २० मॅच सुरु असल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकार विरोधात आज भाजपाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात जनआक्रोशसभेचे आयोजन केले होते. या जन आक्रोशसभेमध्ये बोलताना फडणविसांनी हा आरोप केला आहे.
धानाला बोनस, कृषीपंपाला 24 तास वीज, वीजतोडणी बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, ओबीसी आरक्षण तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध 16 मागण्यांसाठी ही सभा होती
या जनआक्रोश सभेदरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, या महाविकासआघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसुल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्यांकडून जुलमी वसुली सुरू, हा अजब कारभार आहे. बारमालकांची फी 50 टक्के कमी केली. पण गडचिरोली, नंदूरबारमध्ये शेतकर्यांचे वीजबिल 50 टक्के कमी करू, असे त्यांना वाटले नाही. विदेशी दारुवर कर अर्धा केला. पण शेतकर्यांना कोणतीही मदत केली नाही. या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे. हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणार्या निधीत सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. असे करणार्यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत वापरतात.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 SRH vs LSG : हैदराबादनं जिंकला टॉस; लखनऊ संघामध्ये धाकड खेळाडूचं आगमन!
“पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचं दिसून आलं”- प्रवीण दरेकर
“आम्ही चौकशीला भीक घालत नाही”- प्रसाद लाड
राहुल गांधीवरचं प्रेम तर पाहा..! ७८ वर्षीय व्यक्तीनं आपली सगळी संपत्ती केली नावावर; नक्की वाचा!
IPL 2022 : ये दर्द तुम नही समझोगे..! विराटनं सांगितल्या ‘त्या’ दोन सामन्यांच्या कटू आठवणी; पाहा VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
