🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने त्यांचा पहिला सामना गमावला असून लखनऊने आपल्या गुणांचे खाते उघडले आहे.
विंडीजचा धाकड खेळाडू जेसन होल्डरचे लखनऊ संघात आगमन झाले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा संघाबाहेर गेला आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने आपला मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे.
दोन्ही संघांची Playing XI
सनरायझर्स हैदराबाद – केन विल्यमसन (कप्तान), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक.
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : ये दर्द तुम नही समझोगे..! विराटनं सांगितल्या ‘त्या’ दोन सामन्यांच्या कटू आठवणी; पाहा VIDEO
- “मी स्वत: मागासवर्गीय समाजातून…”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
- मनसेचा हनुमान चालीसा कार्यक्रम पोलिसाकडून रद्द
- उद्धवजी पुन्हा सांगतो सावध राहा! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- “शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
