🕒 1 min read
नवी दिल्ली: उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये एक गजबच प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांचा प्रभाव असलेल्या ७८ वर्षीय महिलेने आपली संपूर्ण संपत्ती राहुल गांधींना दिली आहे. वृद्ध पुष्पा मुंजियाल (Pushpa Munjiyal gave her property to Rahul Gandhi) यांनी ५० लाख रुपयांच्या संपत्तीसह १० तोळे सोने दान केले आहे. या वृद्ध महिलेने राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांचे कौतुक केले.
दरम्यान डेहराडूनमधील रहिवासी असलेल्या पुष्पा मुंजियाल यांनी डेहराडून कोर्टात आपल्या मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांना देण्याचे मृत्युपत्र सादर केले आहे. मी राहुल गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित आहे. यामुळेच मी माझी संपत्ती त्यांच्या नावावर करत आहे. यामध्ये ५० लाख रुपयाची मालमत्ता आणि १० तोळे सोन्याचा समावेश आहे. अशी माहिती महानगर काँग्रेस अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी दिली आहे.
लालचंद शर्मा यांनी सांगितले की, या वृद्ध महिलेने आपली संपूर्ण संपत्ती पूर्व प्रदेश अध्यक्ष प्रीतम सिंह यांच्या निवासस्थानी सुपूर्द केली आहे. राहुल गांधी यांच्या कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले.स्वातंत्र्यानंतरही गांधी परिवाराने सर्वोच्च बलिदान दिले आहे. असे पुष्पा मुंजियाल यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“मी स्वत: मागासवर्गीय समाजातून…”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
मनसेचा हनुमान चालीसा कार्यक्रम पोलिसाकडून रद्द
उद्धवजी पुन्हा सांगतो सावध राहा! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा सल्ला
“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
