औरंगाबाद : औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुपारी १२ वाजेपर्यंत २० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात ६ रुग्ण हे बाहेरील जिल्ह्यातील होते. सद्यस्थितीत घाटीत ७१४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. यात ४९४ रुग्ण हे गंभीर स्थितीत आहेत. आजपर्यंत घाटीत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १९३३ वर जाऊन पोहचला आहे.
यात सातारा येथील ६८ वर्षे पुरुष, न्यू पहाडसिंग ६५ वर्षीय स्त्री लेबर कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरुष, अहमदनगर येथील ७६ वर्षीय पुरुष, जालना येथील ५५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६२ वर्षीय पुरुष, गेवराई येथील ७५ वर्षीय पुरुष, नाशिक येथील ३९ वर्षे पुरुष, भावसिंगपुरा येथील २६ वर्षीय स्त्री, पडेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष, विटखेडा येथील ९८ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ४८ वर्षीय पुरुष, जालना येथील ६८ वर्षे पुरुष, श्रीरामपूर येथील ७८ वर्षीय पुरुष, आन्वा येथील ६१ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर येथील ७५ वर्षीय पुरुष , वैजापूर येथील ९२ वर्षीय पुरुष, पिंपरी राजा येथील ६२ वर्षीय स्त्री, माळी गंगापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५० वर्षीय स्त्री यांचा समावेश आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागासह औरंगाबाद शहरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोविडचा विषाणू हा अधिक घातक ठरत आहे. पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही अधिक दिसून येत आहे. आजवर कोरोनामुळे वयोवृद्ध नागरिकांचाच मृत्यू होत होता. मात्र दुस-या लाटेत बालकांसह युवकांचाही मृत्यू होत असल्याचे समारे येत आहे. शहरात मागील चार दिवसांत १० ते २१, तसेच तिसच्या आतील वयोगटातील मृत्यू होत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा सामान्य रूग्णालयातून पाच रेमडेसिविर इंजेक्शन चोरट्याने लांबवले
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
- दिड लाख लसींची मागणी असतांना २५ हजारांवर पालिकेची बोळवण!
- पत्नीच्या प्रियकराची सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
- कोरोनाने थैमान घातलेल्या ‘या’ राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

