बंगळुरू : महाराष्ट्राचं शेजारील राज्य असणाऱ्या कर्नाटकात कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. यामुळेच कर्नाटक राज्यातील करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनसदृश्यं निर्बंध जाहीर केले आहेत.
COVID curfew to be implemented in the state from tomorrow 9 pm for the next 14 days. Essential services allowed b/w 6-10 am. After 10 am shops will close. Only construction, manufacturing & agriculture sectors allowed. Public transport to remain shut: Karnataka CM
(File photo) pic.twitter.com/MSg6S83pDK
— ANI (@ANI) April 26, 2021
कर्नाटक राज्यात दिल्ली आणि महाराष्ट्रापेक्षाही वेगानं करोना संक्रमण फैलावत आहे. त्यामुळे राज्यात १४ दिवसांसाठी ‘कर्फ्यू’ लावण्यात येत आहे. कर्नाटकात दिवस-रात्र लागणारा या कर्फ्यूला उद्या रात्रीपासून सुरूवात होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. सकाळी दहा वाजल्यानंतर ही दुकाने बंद होतील. तसेच सार्वजनिक वाहतुकही बंद राहील.
कर्नाटक सरकारने दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. मात्र लॉकडाऊनकाळात राज्याबाहेर आणि राज्यात प्रवास करण्याची परवानगी नसेल. तसेच उपायुक्तांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी उपाय करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून फेलोशिप मिळेना, बार्टीने अर्ज मागवले नाही
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- ठाण्यात ४ करोनाबाधितांचा संशयास्पद मृत्यू, राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

