🕒 1 min read
नवी दिल्ली: ३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली. आता पहिल्याच आठवड्यात लसीकरणात मोठा विक्रम झाला आहे. तब्बल २ कोटी मुलांचे एका आठवड्यात लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यातही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातही एक लाखाहून अधिक मुलांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच आता राज्यातील शाळाही ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर देशात झारखंड येथे कोरोनामुळे मिनी लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
तेज गति से जारी बच्चों का टीकाकरण ????
Great Going, my Young Friends ???????? ????????
Over 2 crore youngsters between the 15-18 age group have received their first dose of #COVID19 vaccine in less than a week of vaccination drive for children.#SabkoVaccineMuftVaccine pic.twitter.com/787C2RByHQ
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) January 8, 2022
तसेच राज्यात कोरोनासंबंधी निर्बंध कडक करण्यात आली आहेत. मात्र लॉकडाऊनबाबत अजून कोणताही विचार केला जात नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. असे असतानाही लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद दिलासादायक असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत- नितीन गडकरी
- ”KGF” या एकाच चित्रपटाने सुपरस्टार बनलेला यश आज साजरा करतोय त्याचा ३५ वा वाढदिवस
- “पंतप्रधान ओबीसी असतांना त्यांच्याकडून समाजाला अनेक आशा होत्या, परंतु…”
- नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय त्याचं आम्ही अगोदरच..” ममता बॅनर्जीं मोदींवर कडाडल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
