Share

पुणे शहरात आज नव्याने १६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे शहरात आज नव्याने १६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९० हजार ७४२ इतकी झाली आहे. शहरातील १८८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७९ हजार ८७४ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ६ हजार १०१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख १७ हजार ११२ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ०१० रुग्णांपैकी २०० रुग्ण गंभीर तर २७७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८५८ इतकी झाली आहे.

दरम्यान, देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तसेच, गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून नव्या कोरोनाबाधितांची संख्या देखील घटू लागल्याचे दिसून येत आहे. पण, आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहिम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!