🕒 1 min read
औरंगाबाद : आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते मिळवून देण्यात काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा महोत्सव काँग्रेसच साजरा करू शकतो. भाजप नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. भाजपला गांधी नावाचे वावडे आहे. त्यांना हे नाव जमत नाही. त्यामुळेच या पुरस्काराचे नाव बदलण्यासारखे नीच राजकारण त्यांनी केले. या शब्दांमध्ये काँग्रेसचे औरंगाबाद जिल्ह्याचे प्रभारी शिवाजीराव मोघे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसने मोठे बलिदान दिले आहे. त्यामुळे या मिळालेल्या स्वातंत्र्यात काँग्रेसचाही मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची एकात्मता, सर्वधर्मसमभाव काँग्रेसने जपला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. मात्र भाजप सरकारने काय केले खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले.
त्यामुळे हे अतिशय नीच आणि खालच्या दर्जाचे राजकारण आहे. काँग्रेसने देशासाठी काय केले हे पाहायला गेले तर दिवस पुरणार नाही. काँग्रेसने स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर तसेच काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर नाना प्रथमच शहरात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राजारामबापू यांचे स्वप्न पूर्ण ; जयंत पाटलांचा नागरिकांनी केला सर्वपक्षीय सत्कार
- चंद्रकांत खैरेंना पुन्हा हर्षवर्धन जाधव यांचे आव्हान, पुढील लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा
- लसींचा मुबलक पुरवठा करण्यासाठी सीरमने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा – आव्हाड
- शिवन्यात ‘शिवसेना-युवासेना-महिला’ आघाडीची स्थापना; अब्दुल सत्तारांचा पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
