औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील शिवना जि. प. सर्कल मधील विविध गावांत लेखाशीर्ष अंतर्गत ५ कोटी १० लाख रुपयांच्या मंजूर कामांचे भूमिपूजन तसेच शिवसेना- युवासेना व शिवसेना महिला आघाडी शाखेचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोमवारी ( दि.१६) संपन्न झाले. यावेळी कन्नड विधानसभेचे शिवसेना आ. उदयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने ग्रामविकास विभाग अंतर्गत मिळालेल्या निधीतून शिवना जि. प. सर्कल मधील विविध गावात गावअंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, पथदिवे, हायमास्ट, स्मशानभूमी शेड, कब्रस्थान संरक्षण भिंत, सांस्कृतिक सभागृह, सभागृह, शादीखाना, मोठ्या रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण, रस्ता बांधकाम अशा प्रकारच्या गावातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
तालुक्यात सर्वसमावेशक विकासाची कामे करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. सोमवार ( दि.१६ ) रोजी शिवना जि.प.सर्कल मधील शिवना, खुपटा, जळकीबाजार, मादणी, डीग्रस ,धोत्रा , गोळेगाव खुर्द, गोळेगाव बुद्रुक, पाणवडोद खुर्द, पाणवडोद बुद्रुक गावांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व शिवसेना- युवासेना, शिवसेना महिला आघाडी शाखेचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शिवसेना विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, डॉ. संजय जामकर, पं.स.सदस्य शेख सलीम, मुरलीधर काळे आदिंची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्याच्या विकासासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची भरीव तरतूद करणार- डॉ. भागवत कराड
- ‘राज ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत की बाबासाहेब पुरंदरेंचे’ संभाजी ब्रिगेडचा पुन्हा हल्लाबोल
- संजय राठोड यांचे अच्छे दिन येणार? बंजारा समाजाचे धर्मगुरू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- आजपासून खाजगी क्लासेस सुरू; कारवाई केल्यास जेल भरो आंदोलनाचा ‘भाजप’चा इशारा!
- ‘तुम्ही दिल्लीतून तिकीट आणणार, पण निवडून कसे येणार?’, पंकजा मुंडेंचा स्वपक्षातील नेत्यांना धमकीवजा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

