🕒 1 min read
मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.
परंतु मागील काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आणि वाढलेल्या लसीकरणामुळे सध्या तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. काही राज्यांकडून लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी अर्थात ५० टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.
याबाबत सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे. हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे’. असं अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
It is important for the vaccine industry to be self-reliant for its raw materials #AtmanirbharBharat. With this in mind, @SerumInstIndia has acquired 50% stake in SCHOTT Kaisha to ensure uninterrupted supply of essential pharma packaging products for the Indian vaccine industry. pic.twitter.com/Lx81l70RT9
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 17, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा – आव्हाड
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
