औरंगाबाद : गेल्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक मते मिळवत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या समोरील अडचणी पुन्हा वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत उडी मारली होती. मात्र, त्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. आता पुन्हा एकदा पुढील लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेच्या वतीने पुढील लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदावारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. त्यासाठी त्यांना शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांचे आव्हान असणार आहे. त्यात आता पुन्हा हर्षवर्धन जाधव निवडणुकीच्या रिंगणात असतील तर, त्याचाही फटका खैरे यांना पुन्हा बसू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरूवात झाली असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा – आव्हाड
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
