Share

Bus accident in Indore : इंदौरहून जळगावला येणारी बस नर्मदा नदीत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू

Published On: 

मुंबई: मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया-

आज दुःख होणार अशी बातमी आली सकाळी जयदीप पटेल 9522233333 मंत्री प्रदेश भाजपा यांनी निरोप दिला एक बस पुणे येथून निघाली होती ती पुलावरून पडली आहे संबंधित लोकांना कळवले पण बातमी सुन्न करून गेली कोणाला काही माहिती मदत हवी असल्यास MP च्या टीम शी बोलावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा. असे ट्वीट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये- एकनाथ शिंदे 

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!