मुंबई: मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया-
आज दुःख होणार अशी बातमी आली सकाळी जयदीप पटेल 9522233333 मंत्री प्रदेश भाजपा यांनी निरोप दिला एक बस पुणे येथून निघाली होती ती पुलावरून पडली आहे संबंधित लोकांना कळवले पण बातमी सुन्न करून गेली कोणाला काही माहिती मदत हवी असल्यास MP च्या टीम शी बोलावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा. असे ट्वीट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
आज दुःख होणार अशी बातमी आली सकाळी जयदीप पटेल 9522233333 मंत्री प्रदेश भाजपा यांनी निरोप दिला एक बस पुणे येथून निघाली होती ती पुलावरून पडली आहे संबंधित लोकांना कळवले पण बातमी सुन्न करून गेली कोणाला काही माहिती मदत हवी असल्यास MP च्या टीम शी बोलावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 18, 2022
मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये- एकनाथ शिंदे
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Sanjay Raut | राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वी राऊत भावूक! म्हणाले, “मला पॉइंटेड केलं जातंय”
- Kishore Patil : शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत – किशोर पाटील
- Presidential election | नितीन राऊतांचे मत बाद करण्याची बबनराव लोणीकरांची मागणी
- Rohit Pawar : “…साठी राज्य सरकारने केंद्राला भाग पाडावं”, रोहित पवारांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

