औरंगाबाद : पैठण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १ हजार २०० शिक्षकांच्या फेब्रुवारी महिन्याच्या पगाराचे बजेट दीड महिना उशिराने म्हणजे १२ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर प्राप्त झाले होते. गुढीपाडवा व भीम जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे पगार वेळेवर करा. असे शासन निर्देश असतांनाही अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे आत्तापर्यंत शिक्षकांचे पगार झालेले नाही. सध्या शिक्षकांकडून इतरही कामे केली जात आहेत. त्यामुळे शिक्षक सध्या ‘बिनापगारी फुल अधिकारी’ झाल्याचे दिसून येत आहे.
गुढीपाडवा व भीम जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे पगार वेळेवर करा. असे शासन निर्देश असतानाही अधिकारी या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागातून पगाराची देयके सुद्धा चार दिवस अगोदरच लेखा विभागात सादर केलेली होती. तसेच गटविकास अधिकारी हे सुद्धा कार्यालयात उपस्थित होते. मात्र लेखा विभागाचे लेखाधिकारी संजय सोनवणे हे कार्यालयात उपस्थित नसल्याने या शिक्षकांचे पगार खोळंबले आहेत.
त्यामुळे शिक्षकांवर हे सण पगाराविनाच साजरे करण्याची वेळ आली आहे. सध्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शिक्षक कोरोना योद्धे बनून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत लसीकरण करून घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यातच बहुतांशी शिक्षक हे नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने शिक्षकांनाही लागण होत आहे. एकीकडे कोरोनातून बरे होण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च, घराचे हप्ते, कुटुंबियांचा उदरनिर्वाह इत्यादी खर्च तर दुसरीकडे उशिराने होणारे वेतन अशा दुहेरी संकटात शिक्षक सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …आता महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं ? चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
- १६ खासगी रुग्णालय आता डीसीएचसी सेंटर! ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा
- मोदींना कधी एटीएमच्या किंवा बँकेच्या रांगेत पाहिलं आहे का? : राहुल गांधी
- पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर देशातील ‘बाबा’ लॉकडाऊन घोषित करतील; पटोलेंचा टोला
- संतापजनक : प्रेमप्रकरणामुळे दलित व्यक्तीला पंचायतकडून किळसवाणं कृत्य करण्याची शिक्षा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

