Share

संतापजनक : प्रेमप्रकरणामुळे दलित व्यक्तीला पंचायतकडून किळसवाणं कृत्य करण्याची शिक्षा !

Published On: 

गया ( बिहार ) : ‘जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निःसंशय दिसेल’, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं आरंभिक वाक्य आहे. 31 जानेवारी 1920 रोजी हा अंक प्रकाशित झाला. तेव्हापासून आजपर्यंत कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत, पण तरीही म्हणावा इतका बदल झालेला नाही. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती आहे, आणि नेमकी आजच बिहार मधून अत्यंत धक्कदायक बातमी समोर येत आहे.

एका दलित व्यक्तीला जमिनीवरील थुंकी चाटायला लावण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याला जबरदस्तीने मूत्रही पाजण्यात आलं आहे. बिहारमधील गया येथे हा घृणास्पद प्रकार घडला आहे. प्रेमप्रकरणामुळे दलित व्यक्तीला पंचायतकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती. या ७ एप्रिलच्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंचायतदरम्यान अनेक जण थुंकत असून दलित व्यक्तीला ते चाटण्यास लावलं जात आहे.

थुंकी चाटल्यानंतर दलित व्यक्तीला जबरदस्ती मूत्र पाजण्यात आलं. गया येथील वझीरगंज परिसरात हा प्रकार घडला आहे. दलित व्यक्तीचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर पंचायतीकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती. पीडित व्यक्ती महिलेसोबत पळून गेला होता. नंतर महिलेच्या कुटुंबीयांना त्यांना पकडून पंचायतसमोर हजर केलं होतं.

https://twitter.com/Dilsedesh/status/1382006958513737729?s=20

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गया पोलिसांनी घटनेची दखल घेतली. गयाचे एसएसपी आदित्य कुमार यांनी याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!