Share

औरंगाबादेत कोरोनाचे १९ दिवसांत १२० बळी

Published On: 

औरंगाबाद : दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या निघत आहे. शहर हॉटस्पॉट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यातच शहरात कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. आत्तापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १ हजार ३८८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.  त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १ ते १९ मार्च दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण पाहिले तर जिल्ह्यातील तब्बल १२० रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

एकीकडे कोरोनाचा आकडा पहाता जिल्ह्यात प्रतिदिन हजारांहून अधिक समोर येत आहेत. त्यातच दुसरीकडे काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यत १२३८ कोरोनाचे रुग्ण दगावले आहेत.

त्यानंतर २८ फेब्रुवारी पर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे १२६८ वर जाऊन पोहोचले. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान म्हणजे एका महिन्यात जवळपास ३० रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे.

मात्र यात आणखी भर पडली. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण पाहिले तर प्रचंड वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ ३० रुग्णांचा मृत्यू झाला तर २८ फेब्रुवारी नंतर म्हणजे काल १९ मार्च रात्री आलेल्या अहवालानुसार १८ दिवसांत तब्बल १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

एकोणीस दिवसांत १२० रुग्ण दगावले

कोरोनामुळे १ ते १९ तारखेपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल पाहिला तर ११५ रुग्णांना आपला जीव गमावला आहे. १ मार्च रोजी ३, ३ तारखेला ७, ४ ला १, ५ ला ५, ६ ला ५, ७ ला ३, ८ ला ४, ९ ला ८, १० ला ७, ११ ला ९, १२ ला ६, १३ ला ८, १४ ला ५, १५ ला ५, १६ ला ७, १७ ला १७ आणि १८ मार्च ला १५, तर १९ रोजी ५ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. असे एकूण एकोणीस दिवसांत तब्बल १२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!