Share

मारहाण करुन ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलीची चोरी; पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा

Published On: 

परभणी : मारहाण करीत अपहरण करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ब्राह्मणगाव (ता.औंढा) येथील संदीप उर्फ बाळू उत्तम राठोड यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यात शुक्रवारी दुपारी आपण पूर्णा येथील बळीराजा साखर कारखाना येथे ऊस टाकून ममदापूर येथे परत ऊस भरण्यासाठी जात होतो. त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास खुजडा गावाजवळ सोपान गोविंद शेळके (रा. शिंदेवाडी, ता. माजलगाव) यांच्यासह अन्य तिघे एका पांढर्‍या कारमधून त्यांच्याजवळ आले. त्यांनी राठोड यास खाली उतर असे म्हणत सोपान शेळके व त्याच्या सोबतच्या एकाने मारहाण करीत बळजबरीने कारमध्ये बसवले. तेथून परभणी येथे नेऊन सोडले कुणास काही सांगू नकोस, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

त्याचबरोबर आपल्याजवळ असलेले ट्रॅक्टरसह (क्र. एम.एच 38 बी. 5880) दोन ट्रॉली त्यांनी चोरून नेल्या, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अपहरण करून ट्रॅक्टर व ट्रॉली पळवल्याच्या घटनेची माहिती मिळताच, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. पी. चोरमले हे अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांसह खुजडा येथे दाखल झाले. घटनेची माहिती घेत ट्रॅक्टरच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मारहाण करीत आपले अपहरण करून जवळील आठ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टरसह दोन ट्रॉली चोरून नेल्याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास पोलिस कर्मचारी अर्जुन रणखांब हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!