औरंगाबाद : महापालिकेतर्फे मिटमिटा भागात विकसित करण्यात येणाऱ्या सफारी पार्कसाठी लवकरच केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत बैठक होईल. खासदार इम्तियाज जलील व डॉ. भागवत कराड यांना जावडेकर यांची वेळ घेण्याची विनंती करण्यात आली आहे, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
यावेळी पांडेय पुढे म्हणाले, सफारी पार्कच्या कामासाठी दिल्ली येथील पीएमसीची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे पीएमसीचे प्रतिनिधी शहरात येऊ शकले नाहीत. दिल्ली येथे गेल्यानंतर मी पीएमसीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली. सफारी पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. त्यात जागेला संरक्षण भिंत बांधणे, सपाटीकरण व प्रवेशद्वार अशा कामांचा समावेश आहे.
मात्र मुख्य कामे दुसऱ्या टप्प्यात आहेत. अंतर्गत कामे, पिंजऱ्यासह इतर डिझाईनसाठी सेंट्रल झू ऑथोरीटीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. ही फाईल सध्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत बैठकीसाठी वेळ घ्यावा, अशी विनंती खासदार इम्तियाज जलील व डॉ. भागवत कराड यांना केली आहे. दोघांनी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे पांडेय यांनी सांगितले.
जागेचा प्रस्ताव शासनाकडे
शासनाने सफारी पार्कसाठी शंभर एकर जागा महापालिकेला दिली आहे. महापालिकेचे आणखी जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. या जागेचा देखील सफारी पार्कच्या डिझाईनमध्ये समावेश आहे, असे पांडेय यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मारहाण करुन ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलीची चोरी; पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा
- चिंताजनक! शहराचा रिकव्हरी रेट घटला, पॉझिटिव्हिटी रेट वाढला
- कठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या : देवेंद्र फडणवीस
- हिटमॅन आणि सूर्यकुमार यादव यांच्याबाबत असाही योगायोग!
- पाकिस्तानच्या संघाची चिंता वाढवणारी बातमी; कर्णधार बाबर विरोधात एफआयआर दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

