Share

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, काँग्रेसने किती रोजगार दिले : निलेश राणे

Published On: 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आसामच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. जोरहाट येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आसामच्या जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. राज्यातील जनतेला मोफत वीज देणार, महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये भत्ता देणार आणि राज्यात पाच लाख रोजगारांची निर्मिती करणार, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे.

यावर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंनी ‘महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, काँग्रेसने किती रोजगार दिले जाहीर करावे’ अस ट्विट करून राहुल गांधीवर टीका केली आहे.

जोरहाट येथील रॅलीत विकास कामे आणि काँग्रेसच्या अजेंड्यावर भाष्य करतानाच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार केवळ हम दो और हमारे दो… या उक्तीनुसारच काम करत आहे. यात गरीब जनता, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांचा काहीही विचार करण्यात आलेला नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यावर आता निलेश राणेंनी ट्विट करून राहुल प्रश्न केला आहे.

‘महाराष्ट्राला काय देणार राहुल गांधी कधी बोलले नाही. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, काँग्रेसने किती रोजगार दिले जाहीर करावे, महाराष्ट्रातील महिलांना २ हजार रुपये का दिले नाही? महाराष्ट्रात ऊर्जामंत्री सोडून सगळेच लाईट बिलाच्या नावावर शिव्या घालतायत.’ असं ट्विट करून निलेश राणेंनी राहुल गांधीवर जोरदार हमला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!