Share

जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, चहास्टॉल सोमवारपासून 31 मार्चपर्यंत बंद

Published On: 

परभणी :  जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटसह चहास्टॉल व पानपट्टी २२ ( सोमवार) ते 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले आहेत. दरम्यान, चहास्टॉल, रेस्टॉरंट, हॉटेल व किचनला योग्य ती सर्व खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनवने व फक्त पार्सल स्वरूपातच विक्री व वितरित करण्यास परवानगी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यात चहा स्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, किचन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तसेच या ठिकाणी होणार्‍या गर्दीच्या अनुषंगाने सूचना देऊनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये, म्हणून खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे चहास्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, लॉन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले आहेत. या आदेशा अंमलबजावणी करण्याची दबाबदारी ही जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, सर्व नगर पालिका व नगर पंचायत मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्यावर राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!