औरंगाबाद : शहरात मार्च एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र गेल्या ८ दिवसांपासून शहरातील रुग्ण संख्या कमी होतांना दिसत आहे. सध्या शहरात मनपाची अकरा कोविड केअर सेंटर्स सुरु असून याठिकाणी ११७५ रुग्ण उपचार घेत आहेत. येत्या काळात रुग्ण संख्या वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद काँग्रेसने शाहगंज येथील गांधी भवन कोविड रुग्णांसाठी देण्याची तयारी प्रशासनाला दर्शविली आहे. यावर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सकारात्मकता दाखवत येत्या काळात या जागेचा वापर करण्यात येईल असे सांगितले आहे.
कोरोनाच्या या दुसर्या लाटेत औरंगाबाद शहरात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड शिल्लक नाहीत. मात्र ऑक्सिजनची टंचाई नसून विविध रुग्णालयातील बेड रिकामे आहेत. सध्याच्या काळात होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र होम आयसोलेशनमध्ये देखील रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने शाहगंज भागातील काँग्रेस कार्यालय कोविड सेंटरसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्याशी सल्लामसलत व परवानगी घेऊन शहराध्यक्ष मोहम्मद हिशम उस्मानी यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधून औरंगाबादच्या शाहगंज येथे स्थित काँग्रेस कमिटीचे कार्यालय गांधी भवन कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय म्हणून वापरण्यात यावे यासाठी पत्र दिले आहे. याठिकाणी २५०० स्क्वेअर फूट हॉल, तसेच ६०० स्क्वेअर फूट शेजारी लहान हॉल आहे. याठिकाणी पाणी, ड्रेनेज, वीज सर्व सुविधा आहेत. प्रशासनाने याबाबत सकारात्मक दाखवत काँग्रेसचे आभार व्यक्त केले आहेत.
पक्षातील वरिष्ठांशी चर्चेनंतर आम्ही गांधी भवन या आमच्या पक्ष कार्यालयाला कोविड सेंटर म्हणून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाने देखील याबाबत काँग्रेसचे आभार मानत सकारात्मक दाखवली आहे. येत्या काळात गांधी भवन कोविड सेंटरमध्ये रुपांतर होईल. यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.
– हिशाम उस्मानी, काँग्रेस शहराध्यक्ष
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी ई-पास सक्तीचा, पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरु
- रस्त्यावर फिरणाऱ्यांची तपासणी सुरु करताच हिंंगोली शहरातील रस्ते सामसूम
- सकारात्मक! बीपी, शुगर असूनही बीडच्या या आजींनी केली कोरोनावर मात
- सकाळच्या सत्रात २० कोरोनाबाधितांचा घाटीत मृत्यू!
- घरपोच दारूची विक्री न करणाऱ्या चौघाविरूध्द गुन्हा दाखल


