नवी दिल्ली : खेळाची रंगत तेव्हाच वाढते जेव्हा दोन संघांमध्ये विजयासाठी चढाओढ लागते. पण नुकत्याच संपलेल्या एका सामन्यात तब्बल ११८७ धावा झाल्या. पण सामन्याचा निकाल मात्र लागू शकला नाही. या सामन्यात एवढ्या धावा होऊनही निकाल का लागला नाही. हे आता समोर आले आहे.
सध्या पाहायला गेलं तर कसोटी सामन्यांचे निकाल ३ ते ४ दिवसांच लागत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. परंतू असा एक सामना पाहायला मिळाला की ज्यामध्ये तब्बल ११८७ धावा झाल्या. तरीही सामन्याचा निकाल काही लागू शकला नाही.
ही गोष्ट घडली ती पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रावळपिंडी येथील पहिल्या कसोटी सामन्यात. या कसोटीत तब्बल पाच दिवसांचा खेळ झाला. पहिला डाव पाकिस्तान संघाने ४ बाद ४७६ धावांवर घोषित केला. पाकिस्तानी फलंदाजांनी यावेळी दमदार फलंदाजी केली. आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला झटपट बाद करण्याचे स्वप्न पाहीले. पण ऑस्ट्रेलियाच्या संघानेही पाकिस्तानला कडवी झुंज दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४५९ धावा केल्या. आणि पाकिस्तानला अवघ्या १७ धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर आता दुसऱ्या डावात नेमकं घडणार तरी काय, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली होती. परंतु सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात पाकिस्तान संघाने एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे सामना अनिर्णीत राहिला. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या इमाम उल हकने नाबाद १११ धावांची खेळी केली. पहिल्या डावातही त्याने शतक केले होते. तर दुसरा सलामीवीर अब्दुल्ला शफीकनेही नाबाद १३६ धावांची शतकीय खेळी केली.
त्यामुळे या डावात एकही विकेट न गमावता पाकिस्तानने दुसऱ्या डावात २५२ धावा केल्या. या सामन्यात दोन्ही डावात शतक करणाऱ्या इमामला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

