औरंगाबाद : ही घटना आहे कर्नाटक मधील. कर्नाटकमध्ये एक तरुणी कॉलेजमध्ये हिजाब घालून प्रवेश करते. ती प्रवेश करताच काही तरुण तिच्याकडे घोषणाबाजी घेऊन येतात. या तरूणांनी भगवी कपडे घालून तरूणीच्या समोर “जय श्री रामच्या” घोषणा दिल्या. हे तिच्या लक्षात येताच तिनेही तरूणांना प्रत्युत्तर म्हणून “अल्लाहू अकबरच्या” घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व यानंतर देशातलं अत्यंत तापल होतं.
तेव्हा राज्य सरकारने कर्नाटकमधल्या अनेक शाळा बंद केल्या. कारण परिस्थिती गंभीर चिघळण्याची शक्यता व्यक्त केली होती व चिघळली देखील होती. या भीतीपोटी व सावध राहण्यासाठी अनेक पालकांनी मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणावेळी खूप जास्त लोकांनी निषेध नोंदविला होता तर काहींनी या प्रकरणाला समर्थन केले होते. परंतु आता औरंगाबादमध्ये मुस्कान खानचा सत्कार करणार असल्याचे जाहीर होताचं अनेकांनी विरोध दर्शविला आहे असे दिसून येत आहे.
सत्कार केल्यास रस्त्यावर उतरणार! संजय केनेकर
कर्नाटकातील हिजाब धारी बेबी मुस्कान खानचा वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते १४ मार्चला सत्कार होणार आहे अशी माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. सत्कार केल्यास रस्त्यावर उतरणार! असा इशारा शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला असल्याने वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तविली जात आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने सत्कार केला तर काय होणार? किंवा वंचित बहुजन आघाडी सत्कार करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या –


