Share

भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवारांचे महत्वाचे योगदान! बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवताना शरद पवार यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या निर्णयांचा भारतीय क्रिकेटला आजही फायदा होत आहे. असे मत बीसीसीआयचे माजी पदाधिकारी प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांनी व्यक्त केले.

“शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना भारतात महिला क्रिकेटला चालना मिळाली. २००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाली. त्यावेळी तेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते. त्यांच्या कार्यकाळातच माजी क्रिकेटपटूंसाठी निवृत्तीवेतनची सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. असे शेट्टी म्हणाले.”

प्राध्यापक असलेल्या शेट्टी यांच्या ‘ऑन बोर्ड माय इयर्स इन बीसीसीआय’ या पुस्तकाचे मंगळवारी पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एमसीएचे अध्यक्ष डॉ विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार शेट्टीबद्दल बोलताना म्हणाले “मी बीसीसीआयनंतर आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले. त्यावेळी मी शेट्टी यांनाही आयसीसीमध्ये येण्याबाबत विचारले होती. मात्र त्यांनी बीसीसीआय आणि एमसीएसाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले. अशी आठवण यावेळी पवार यांनी सांगितली. पवार हे २००५ ते २००८ या कालावधीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते. तर शेट्टी यांची २००६ मध्ये बीसीसीआयचे पहिले मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!