Share

MNS Foundation Day : पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार मेळावा

Published On: 

🕒 1 min read

पुणे: आज (९ मार्च) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन (MNS Foundation Day) असून मनसेची स्थापना होऊन आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी मनसेचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान २००६ साली शिवसेना सोडत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. दरम्यान दरवर्षी मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी हा कार्यक्रम पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होत आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे ज्या ठिकाणी सभा होणार आहे तेथे येणार्‍या महिला पांढरा फेटा आणि भगव्या साड्यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच साधारणत ८ ते १० हजार मनसैनिक पुण्यात येणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. दरम्यान काही दिवसातच महापालिका निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसैनिकांना काही बोलतात का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!