🕒 1 min read
मुंबई: ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पाकिस्तान दौरा सुरु आहे. ज्यात कसोटी मालिकेच्या पहिल्या सामना अनिर्णित राहिला आहे. WTC क्रमवारीत या सामन्याचे महत्व असूनही संघानी ड्रॉ साठी खेळणे क्रिकेट रसिकांना पचनी पडले नाही. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यावर आता कर्णधार पॅट कमिन्सने रावळपिंडी येथे अनिर्णित ड्रॉवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पॅट कमिन्स (pat cummins) म्हणाला “मला वाटते की खेळाडूंना नेहमीच बॅट आणि बॉलमध्ये सारखी लढाई हवी असते आणि मला वाटते की कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आणि सर्वात फायद्याचे आहे. “खेळपट्टीबद्दल सांगायचे तर ती पारंपारिक खेळपट्टी नव्हती. तुम्ही रावळपिंडी मध्ये खेळत असाल आणि सामना ड्रॉ झाला तरी हे वाईट नाहीये.” सामना निकालाविना संपला तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने पहिल्या डावात ४७६-४ धावा घोषित केल्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४५९ धावा केल्या.
Updated ICC World Test Championship Points Table After Pakistan vs Australia 1st Test. #PAKvAUS #ICC #Cricket #WTC23 pic.twitter.com/p0DJC2hd5o
— CricWish (@CricWishPak) March 9, 2022
Australia Vs Pakistan 1st Test ends in a draw after 1,187 runs were scored with just 14 wickets taken across 5 days.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2022
Rawalpindi test match is embarrassment for the cricket fans. It's a historic test match, and this flat road pitch doesn't add any value. TEST cricket needs result-oriented pitches. Then only test cricket will grow #PakvsAus #PakvAus
— Ash (@Ashsay_) March 8, 2022
Test cricket should never be played on pitches like the one we’d at Rawalpindi. Five days of cricket and we just had 14 wickets falling. What a terrible thing to witness if you’re a test cricket fan #DoddaMathu #PAKvAUS #CricketTwitter
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (@doddaganesha) March 8, 2022
१९९८ नंतर पाकिस्तानच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची ही पहिली कसोटी होती. पहिल्या कसोटीच्या अंतिम दिवशी पाकिस्तानच्या सलामीवीरांचे वर्चस्व होते, इमाम-उल-हकने सामन्यातील दुसरे शतक झळकावले आणि अब्दुल्ला शफीकने पहिले शतक झळकावले. हकने पहिल्या डावात १५७ धावा करत दुसऱ्या डावात १११ धावा केल्या, तर शफीकने १३६ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवारांचे महत्वाचे योगदान! बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य
- MNS Foundation Day : पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार मेळावा
- वंचित बहुजन आघाडीकडून मुस्कान खानचा सत्कार करण्याचे जाहीर, भाजपचा विरोध
- वेस्ट इंडिजविरुद्ध जॉनी बेअरस्टोचे शानदार शतक!
- “देवेंद्र आहेत ते भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच…”, भातखळकरांचा ट्वीट करत इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
