Share

इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊनचे शटर उचकटून ११ लाखांचा ऐवज चोरी

Published On: 

औरंंगाबाद : एका इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी ११ लाख ३२ हजार ३५९ रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजाजनगर मोरे चौकातील प्रतीक डिजिटल वल्र्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक सुरजितसिंग छाबरा (वय ५९, रा. इटखेडा, पैठण रोड, औरंगाबाद) यांनी दुकानातील शिल्लक माल ठेवण्यासाठी सी-सेक्टरमधील २७४ प्लॉॅटमध्ये गोडाऊन घेतले होते. त्या ठिकाणी सर्व माल ठेवण्यात येतो. २ जून रोजी मुलगा प्रतीक गोडाऊनमध्ये माल आणण्यासाठी गेला असता त्याला शटर उचकटून माल लंपास केल्याचे समजले.

त्याने ही माहिती वडिलांना दिली. छाबरा यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत दुकानातील एलईडी, एसी, वॉशिंग मशीन, फ्रिज आदी वस्तू चोरीला गेल्याची तक्रार दिली. अंदाजे ११ लाख ३२ हजार ३५९ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!