Share

जालन्यात १०७ नव्या रुग्णांची भर तर ४१० जणांची कोरोनामुक्ती!

Published On: 

जालना: जालन्यात कोरोना बाधितांची संख्या आता कमी होत असल्याचे दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. बुधवारी ४१० जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट जास्तच घातक ठरत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे म्युकरमायकोसिस आजार, यामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १०७ नव्या रुग्णांची भर पडली. तसेच दिवसभरात बरे झालेल्या ४१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जालना शहर १३, देवमूर्ती १, कुंभेफळ सिंदखेड १, पारध १, उमरी १, मंठा तालुक्यातील देवठाणा १, दुधा १, गुळखांड ३, जयपूर १, पाटोदा २, शिरपूर २, तळणी १, परतूर तालुक्यातील पिंपरखेडा १, वाटूर १, घनसावंगी शहर ५ , अंतरवाली टेंभी १, भायगव्हाण १, जिरडगाव १ व इतर भागातून काही रुग्ण, अशाप्रकारे आरटीपीसीआरद्वारे ९७, तर अँटिजेनमधून १० असे एकूण १०७ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ लाख ३३ हजार ६५९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६० हजार ३१५ अहवाल पॉझिटिव्ह तर ३ लाख ७१ हजार ४०५ निगेटिव्ह आले. तर प्रयोगशाळेत एकूण ४ हजार ३०७ नमुने प्रलंबित आहेत. दरम्यान, आतापर्यंत एकूण ५८ हजार ७३ रुग्ण यशस्वी औषधोपचाराने कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून १ हजार २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या अॅक्टिव्ह १ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!