Share

विधानसभेत सर्व जागांवर लढण्याची तयारी ठेवा : मुख्यमंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीला अवघे ३ महिने बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनी एकत्र निवडणूक लढवत प्रचंड यश मिळवले होते. परंतु आता भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत राज्यात सर्व २८८ विधानसभा जागांवर लढण्याची तयारी ठेवा असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “युती होईल, पण त्यात मुख्यमंत्री कोणाचा हे समजूतदार माणसाला कळते. अननुभवी, बालिश लोकांना त्याची चर्चा करू द्या, जिंकण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन यांनी करत युती झाली, तरी मुख्यमंत्रिपद भाजपकडे राहील”, असे स्पष्ट केले.

पुढे बोलताना त्यांनी “राज्यात शिवसेनेशी युती होईल, पण कोणाला कोणत्या जागा सुटतील, हे ठरलेले नाही. तुम्ही मात्र, सर्व २८८ जागा लढण्याची तयारी ठेवा”, असे उद्गार त्यांनी काढले. तसेच मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, या चर्चेत तुम्ही पडू नका, ते आम्ही बघू, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभेला ७०-८० टक्के मते युतीला मिळाली, तेथील पक्षाच्या आमदारांनी गाफील न राहता परिश्रम घ्यावेत, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती होती. परंतु विधानसभा निवडणुकीत दोनही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती त्यामुळे यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!