Share

महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्र्यांच्या वर्ध्यातल्या सभेत उडाला गोंधळ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची ताकद वाढवण्यासाठी महाजनादेश यात्रेवर आहेत. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्र जनादेश’ यात्रेला सुरवात झाली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातून ‘महा जनादेश’ यात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ही यात्रा वर्ध्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर वर्धा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान एक युवक उभा राहिला आणि त्याने बॅनर फडकवत घोषणाबाजी केली. याच गोंधळामुळे काही काळ सभेत गोंधळ उडाला होता. मात्र नंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलंय.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक आमदारांनी भाजपचा रस्ता धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना सत्ताधाऱ्यानी राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्याने राष्ट्रवादी पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

पुणे : वर्किंग वूमन्ससाठी लष्कराने उभारलेल्या हॉस्टेलमधील महिलांना होतोय रोडरोमिओंचा त्रास

भाजपची आज मेगा भरती, ५ आमदारांसह अनेक कार्यकर्त्यांचा झाला पक्षप्रवेश

अमानुषतेचा कळस : अर्धनग्नकरुन ट्रकचालकाला मारहाण

निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही आशा नाही : राज ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!