🕒 1 min read
Vinayak Raut | मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. विधानसभा निवडणुकीसाठी संपर्क प्रमुखांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तयारीला लागा. तशी परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. तसेच महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यात १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे सांगितले.
“येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रात १०० टक्के विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागणार. कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुरु असलेली केस किती जरी विलंब झाला तरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात त्या केसचा निकाल न्यायालयाला लावावा लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल आणि विधावसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”, असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत यांनी शिंदे गटावर देखील जोरदार घणाघात केला आहे. शिंदे गटातील आमदार संपर्कात आहेत का, जी आजही मातोश्रीवर येऊ शकतात?, असा प्रश्न विनायक राऊत यांना विचारण्यात आला. यावर विनायक राऊत म्हणाले आता आशेवर जगणारे आम्ही मडंळी नाही. आता कर्तुत्वावर मला पुन्हा उभं करायचं आहे. हे उभं करत असताना, उद्धव ठाकरे यांचा अंधेरीमध्ये पहिला विजय झाला आहे. ज्यांनी एकदा बेईमानी केली ते बेईमानचं आहेत. बेईमानीला घारामध्ये थारा देणं म्हणजे कीड लागल्यासारख होईल, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.
महाविकास आघाडीतील १३ ते १४ आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केले होते. यावर विनायक राऊत म्हणाले, “त्यांनी स्वप्न पाहत बसावी, शेवटची गद्दारी दोन दिवसांपूर्वी झाली, जी आम्हाला अपेक्षीत होती. गद्दार केवळ बेईमानी करुन थांबलेले नाही तर त्यांनी शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाला हात घालायचा ठरवला आहे. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे. शिंदे गटातील आमदारांची एकमेकांच्या मानेवर बसायची तयारी सुरु झाली आहे. कारण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही,” असे विनायक राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Amruta Fadanvis | “…म्हणून मोदी आणि वरच्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं”; अमृता फडणवीसांनी सांगितलं कारण
- Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यन करणार अक्षय कुमारला रिप्लेस?
- Vinayak Raut | “बेईमानीला थारा देणं म्हणजे कीड लागल्यासारख” ; विनायक राऊत यांचा घणाघात
- IPL 2023 | KKR ला आणखी एक झटका, ‘हा’ खेळाडू देखील खेळणार नाही आयपीएल
- Aravind Sawant | “माजी मुख्यमंत्री सौजन्याची नाही, तर सुडाची मूर्ती”; ठाकरे गटाची फडणवीसांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
