Share

Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यन करणार अक्षय कुमारला रिप्लेस?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चर्चेत आहे. हेराफेरी 3 या चित्रपटांमध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aryan) बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याला रिप्लेस करेल का? अशा देखील बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे अक्षय कुमारचे चाहते नाराजी व्यक्त करत आहे. कारण हेरा फेरी ही भारतातील चित्रपट फ्रेंचाईजी मधली एक लोकप्रिय सिरीज आहे. 2000 साली हेरा फेरी चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर या चित्रपटाचा दुसरा भाग 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील श्याम, राजू आणि बाबू भैया या लोकप्रिय भूमिका झाल्या आहेत. त्यामुळे आता राजूचे पात्र अक्षय कुमार न करता कार्तिक आर्यन करेल का? हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) मध्ये कार्तिक आर्यन अक्षय कुमारला रिप्लेस करेल का?

एंटरटेनमेंट पोर्टलच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार यापुढे हेरा फेरी फ्रेंचाईजीचा भाग राहणार नाही. त्यामुळे या चित्रपटातील राजू हे पात्र पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. कारण हे पात्र अक्षय कुमार शिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही. दरम्यान हेरा फेरी च्या तिसऱ्या भागांमध्ये कार्तिक आर्यन पूर्णपणे एका नव्या पात्रांमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षयने का नाकारला हेरा फेरी 3?

हिंदुस्तान टाइम्सच्या 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या समिटला अक्षय कुमार उपस्थित होता. दरम्यान, त्याला हेरा फेरी विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला की, “मी हेरा फेरी चा भाग राहिला आहे. अनेक लोकांच्या आठवणी या चित्रपटाबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. बरोबर या चित्रपटाची माझ्याही चांगल्या आठवणी आहेत. मात्र मला खेद वाटत आहे, की इतक्या वर्षात आम्ही या चित्रपटाचा तिसरा भाग बनवला नाही. जेव्हा मला या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल कळाले तेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि स्क्रीन बघून मी समाधानी नव्हतो. त्यामुळे मी या चित्रपटातून बाहेर पडलो आहे.”

हेराफेरी मधील प्रसिद्ध पात्र बाबू भैया म्हणजेच परेश रावल (Paresh Rawal) यांनी ट्विटर वर एका चाहत्याला दिलेल्या उत्तरानंतर अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यन हेरा फेरी तीन मध्ये दिसेल, ही चर्चा सुरू झाली. एकाच चाहत्याने परेश रावल यांना विचारले होते की कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 मध्ये खरच दिसणार आहे का? तर परेश रावल यांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देत, “होय हे खरे आहे”, असे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!