Share

Vinayak Raut | “बेईमानीला थारा देणं म्हणजे कीड लागल्यासारख” ; विनायक राऊत यांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

Vinayak Raut | मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार घणाघात केला आहे. शिंदे गटातील आमदार संपर्कात आहेत का, जी आजही मातोश्रीवर येऊ शकतात?, असा प्रश्न विनायक राऊत (Vinayak Raut) यांना विचारण्यात आला. यावर विनायक राऊत म्हणाले आता आशेवर जगणारे आम्ही मडंळी नाही. आता कर्तृत्वावर आम्हाला पुन्हा उभं करायचं आहे. हे उभं करत असताना, उद्धव ठाकरे यांचा अंधेरीमध्ये पहिला विजय झाला आहे. ज्यांनी एकदा बेईमानी केली ते बेईमानचं आहेत. बेईमानीला घारामध्ये थारा देणं म्हणजे कीड लागल्यासारख होईल, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.

“येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रात १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार. कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुरु असलेली केस किती जरी विलंब झाला तरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात त्या केसचा निकाल न्यायालयाला लावावा लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल आणि विधावसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

महाविकास आघाडीतील १३ ते १४ आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केले होते. यावर विनायक राऊत म्हणाले, “त्यांनी स्वप्न पाहत बसावी, शेवटची गद्दारी दोन दिवसांपूर्वी झाली, जी आम्हाला अपेक्षीत होती. गद्दारांनी केवळ बेईमानी करुन थांबलेले नाही तर त्यांनी शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाला हात घालायचा ठरवला आहे. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे. शिंदे गटातील आमदारांची एकमेकांच्या मानेवर बसायची तयारी सुरु झाली आहे. कारण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही,” असे विनायक राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!