Share

IPL 2023 | KKR ला आणखी एक झटका, ‘हा’ खेळाडू देखील खेळणार नाही आयपीएल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे. तर दुसरीकडे आयपीएलच्या मिनी ऑक्शन पूर्वी अनेक संघांमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) ला आणखी एक झटका बसला आहे. सॅम बिलिंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्स सोडल्यानंतर आणखी एक खेळाडू यावर्षी आयपीएल मध्ये दिसणार नाही.

सॅम बिलिंग्सच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स देखील आयपीएल 2023 मध्ये खेळणार नाही. व्यस्त आंतरराष्ट्रीय सामन्याचे वेळापत्रक असल्यामुळे पॅट कमिन्स हा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्सच्या आधी इंग्लंडचा स्टार फलंदाज सॅम बिलिंग्स याने देखील व्यस्त वेळापत्रकामुळे आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांबरोबर कोलकत्ता नाईट रायडर्स साठी शेवटच्या तीन स्पर्धा खेळल्या. दरम्यान, हिपच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2022 मध्ये फक्त पाचच सामने खेळता आले होते. त्यामध्ये देखील त्याने 7 विकेट घेऊन 53 धावा केल्या होत्या. पॅट कमिन्सने आयपीएलमध्ये चांगला प्रभाव पडला नसला, तरी त्याची क्षमता सर्वांना माहीत आहे त्यामुळे आयपीएल हंगामात KKR ला त्याची कमी भासू शकते.

पॅट कमिन्सने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून आगामी आयपीएल मध्ये खेळणार नसल्याची माहिती आपल्याच चाहत्यांना दिली आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ” मी पुढील वर्षी आयपीएल न खेळण्याचा कठीण निर्णय घेत आहे. कारण पुढचे 12 महिने आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एक दिवसीय मालिकेमुळे खूप व्यस्त आहे. त्यामुळे मी थोडी विश्रांती घेऊन नंतर या सामन्यांना सुरुवात करणार आहे. केकेआर संघाने मला समजून घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!