🕒 1 min read
Aravind Sawant | नवी दिल्ली : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय.
माजी मुख्यमंत्री यांनी स्वतः काल परवा मला बदला घ्यायचा होतं, असं स्पष्ट म्हटलं होतं, याचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती आहेत, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही निशाणा साधलाय.
ठाण्यात झालेल्या राड्यावरून त्यांनी शिंदेंना चांगलंच सुनावलं आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्याच विरोधात माणसं उभी राहतात, हे त्यांना झोंबलंय, म्हणून ही प्रतिक्रिया आली असल्याचं सावंत म्हणाले. तसेच या राड्यात स्थानिक लोकं नाहीत, त्यात बाहेरुन आलेली लोकं होती, असा आरोपही सावंत यांनी केला.
दरम्यान, काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाली. भेटीवरूनही अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना रात्री भेटायची सवयच आहे असं ते म्हणाले. त्यांनी याआधी जे कट कारस्थान रचलं, ते तर वेशांतर करुन केलं आणि त्यावर सभागृहातही त्यांनी सांगितलं होतं, असंही अरविंद सावंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Narvekar | “जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का?”; राहुल नार्वेकर म्हणाले,
- Ajit Pawar | “सत्तेत असताना गृह खाते राष्ट्रवादीकडे होते, मात्र…” ; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- UPSC Recruitment | UPSC यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Eknath Shinde | जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या विनयभंगा प्रकरणी एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Shivsena | धनुष्यबाण चिन्ह पुन्हा ठाकरे गटाला मिळणार?, आज होणार महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
